आषाडी एकादशिला धोंडूतात्या मंदिर कुलुप बंद

आषाडी एकादशिला धोंडूतात्या मंदिर कुलुप बंद

सलग दुसरा वर्ष, प्रशासनाच्या आवाहनास भाविकांची साथ
डोंगरशेळकी (प्रतिनीधी) : मराठवाड्याचे प्रतिपंढरपुर म्हणुन आोळखले जानारे तिर्थक्षेत्र श्री समर्थ धोंडूतात्या महाराज संस्थान डोंगरशेळकी ता. उदगीर येथे आषाडी एकादशिला मोठी गर्दी असते. मात्र गेल्या वर्षीपासून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला प्रतिसाद देत मंदिर संस्थान कमिटिने कोरोना महामारी मुळे संसर्ग वाढु नये म्हणुन त्या दिवशी भाविका करिता दर्शना साठी मंदिर पुर्णत: दिवसभर बंद ठेवन्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतीत विश्वस्थ व्यंकटराव मुंडे यांनी स्पष्टीकरण केले. या एकादशीला शेजारील राज्य कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यासह सह भावीक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे कमिटिच्या विश्वस्थांनी आषाडी एकादशिला प्रतिवर्षाप्रमाणे सकाळची महापुजा उदगिर येथिल तहसिलदार  रामेश्वरजी गोरे  याच्या हस्ते सप्तनीक महापुजा व आरती होईल. त्यानंतर मंदिर संपूर्ण दिवसभर बंद असणार आहे.तरी पंचक्रोशीतील येनार्‍या सर्व भाविक भक्तांनी आषाडी एकादशीला समर्थाच्या दर्शनासाठी येउ नये. असे आवाहन संस्थानच्या वतिने करण्यात आले आहे.

पोलिस प्रशासना तर्फे देखील भाविकांना आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात वाढवना पोलिस स्टेशनचे सपोनि  बाळसाहेब नरवटे यांना विचारणा केली असता  जिल्हा प्रशासनाच्या आपती व्यवस्थापनाच्या आदेशानुसार आषाडी एकादशिला कोणीहि दर्शनासाठि येउ नये. प्रशासनास सहकार्य करावे. त्या दिवशी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवनार असल्याचे व भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ही त्यांनी  केले आहे.

About The Author