ना. संजय जी बनसोडे यांच्या शुभहस्ते फळबाग लागवडीचा शुभारंभ

ना. संजय जी बनसोडे यांच्या शुभहस्ते फळबाग लागवडीचा शुभारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत फळबाग लागवड शुभारंभ प्रसाद फार्म जानापूर रोड गुरधाळ येथे ना. संजय बनसोडे  यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. संजय भाऊ बनसोडे हे होते. तर प्रमुख उपस्थिती राजेश्वरजी निटूरे, रमेश आण्णा अंबरखाने, दत्तात्रय गावसाने, शिवाजीराव मुळे, कल्याण पाटील, श्री प्रवीण मेंगशेट्टी, श्री रामेश्वर जी गोरे, श्री महेश तीर्थकर, श्री महेश सुळे, श्री संजय नाबदे हे उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश तीर्थकर यांनी केले. त्यात त्यांनी पोकरा अंतर्गत विविध घटकांची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक शेतकऱ्याने फळबाग लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी, यासाठी पोखरा योजना आणि म ग्रा रो ह यो योजनेमुळे विविध प्रकारची फळबाग लागवड करता येते. त्यासाठी कृषी विभागामार्फत अनुदान दिले जाते. यात सलग व बांधावर ही फळबाग लागवड करता येते. यामध्ये खड्डे खोदणे, कलमे खरेदी करणे, कलमे लागवड करणे, ठिबक सिंचन यासाठी लागवडीपासून तीन वर्षापर्यंत अनुदान दिले जाते. फळबागेतून उत्तम आर्थिक फायदा मिळतो. त्यामुळे पारंपरिक शेतीला जोडून फळबाग लागवड करण्याचे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. 

यावेळी  शिवाजी मुळे, कल्याण पाटील, राजेश्वर निटुरे यांनी शेतकऱ्याला संबोधित केले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना बाबत श्री दत्तात्रय गावसाने  यांनी मार्गदर्शन केल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा योजनेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री नितीन दुरुगकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री संजय नाबदे तालुका कृषी अधिकारी  यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विजय निटुरे, प्रसाद निटूरे व श्री अजय निटूरे प्रगतशील शेतकरी व उद्योजक ,  भालेराव राजकुमार, अविनाश हेरकर, श्री अमोल कांडगिरे, नागेश पटवारी व परिसरातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, गटनेते व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

About The Author