जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठाण लातूर च्या वतीने जिल्हा न्यायालय परिसरात आंतराष्ट्रीय न्याय दिन साजरा
लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा विषयी सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूर च्या वतीने आंतराराष्ट्रीय न्याय दिवस चे औचित्य साधून पक्षकारांना पुष्पगुच्छ देऊन दिन साजरा करून शुभेच्छा देण्यात आले. न्यायालय परिसरात निकालाच्या प्रतीक्षेत पक्षकार हा न्यायालयात येतो त्याचे न्यायापासून समाधान मिळणे हे त्याला अपेक्षित असते पण न्याय देताना न्यातदेवता यांना दोन्ही बाजू समजून कोणावरही अन्याय होणार नाही याची जवाबदारी घेऊन न्याय दिला जातो. न्याय देताना न्याय समोर सर्वजण सारखे असतात.तसेच आंतरराष्ट्रीय दिन हा १९९८ च्या जुलै रोजी भरलेल्या परिषदेत आंतराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे प्रारूप निश्चित केले जगाच्या न्यायेतिहासात मैलाचा दगड ठरावा. आसा तो दिवस जगभर आंतराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो.कुठल्याही व्यक्तीस न्याय मिळवून देण्यासाठी त्या त्या सार्वभौम देशाचे न्यायालय खरे तर समर्थ असते.न्यायालयाची स्थापना ही गुन्ह्यास अटकाव करण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरते सर्व सामान्य लोकांचे न्यायालय वर विश्वास आहे न्याय हा सर्वांच्या हक्कासाठी आहे. तसेच १अगस्ट रोजी राष्ट्रीय लोकाअदालत चे आयोजन कारण्यात आले आहे सर्व लोकांनी जास्तीत जास्त आपली प्रलंबित असलेली प्रकरण लोकअदालतीत ठेऊन निकाली काडावीत ज्याने न्याय लवकर मिळेल आणि वेळ ही वाचेल त्यामुळे लोकआदालतीत सहभाग नोंदवा आणि लवकर न्याय मिळावा असे आव्हान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा न्यायाधीश एस. डी. अवसेकर यांनि केले. यावेळी अँड. अजय कलशेट्टी, अँड. महेश खणगे, अँड. कैलास अनसरवाडीकर, अँड.सुरेश सलगरे, अँड. कल्पना भुरे, अँड. सारिका वायबसे, अँड. सुनंदा इंगळे, अँड.वसुधा देशपांडे, अँड. गायत्री नल्ले, अँड.शैलाजा आरध्ये, अँड.शिवकुमार बनसोडे, अँड. राजेंद्र लातूरकर, अँड. सागर वाघमारे, कैलास गरूडकर, विकास ढमाले, अभिषेक शिंदे,गजानन पांचाळ, मारुती देशमाने, आदी उपस्थित होते.