हत्तीबेटावरील रासेयो शिबिराच्या समारोपास मान्यवरांची हजेरी
उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील देवर्जन गावाजवळील हत्तीबेट पर्यटनाच्या गडावर गेल्या सात दिवसापासून उदगीर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सुरू असलेल्या शिबिराचा समारोप मुंबई-पुणे येथील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई पोर्ट ट्रस्ट चे अधिकारी नरेश देवकत्ते होते.तर व्यासपीठावर भारतीय नौसेनेचे अधिकारी अजय डिंगोरकर,अनिल चव्हाण, जिएसटी अधिकारी महेंद्र नार्वेकर, भारत पेट्रोलियम चे अविनाश खुळे, बायर चे सतीश गायकवाड, लातूरचे उद्योजक भारत माळवदकर, भरत हंचाटे,रवी हरिओम, पद्माकर गायकवाड,भाऊ पाचरूपे, उपप्राचार्य शेषनारायण जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुंबई-पुण्याच्या या मान्यवरांनी रासेयो स्वयंसेकांनी हत्तीबेटावर राहून केलेल्या कामाचे व हत्तीबेटावर होत असलेल्या विकास कामांचे कौतुक केले.सामाजिक जनजागृतीत रासेयोचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व्ही. एस. कुलकर्णी यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे यांनी केले.
