कलिका हब्बा सरकारी प्राथमिक शाळा भवानी तांडा बावलगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न

0
कलिका हब्बा सरकारी प्राथमिक शाळा भवानी तांडा बावलगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले)
सीमा भागातील औराद तालुक्यातील भंडारकुमठा या केंद्रात कलिका हब्बा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष रामराव जाधव अध्यक्ष सरकारी प्राथमिक शाळा भवानी तांडा बावलगाव, हे होते. या वेळी नेमोदिन विस्तार अधिकारी औराद बी, पंढरी आडे, राजकुमार नाईकवाडे , श्रीमती वनमाला नाईक , प्रकाश बर्दापुरे एकंबा केंद्राचे केंद्रप्रमुख, रणजीत शिंदे, संजीवन बिराजदार, मुख्याध्यापक गणेशपुर सतीश मुळे मुख्याध्यापक भवानी तांडा बावलगाव, बालाजी नामदेव जानते, शिवाजीराव जाधव ग्रामपंचायत सदस्य होकरणा, दादाराव जयराम जाधव, देविदास तुकाराम जाधव, हनुमंतराव नाईक, धनराज भरडगे माजी मुख्याध्यापक भवानी तांडा बावलगाव या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन उद्घाटन करण्यात आले. त्या सोबतच या कार्यक्रमास उपस्थित भवानी तांडा ग्रामस्थ सन्मानित व्यक्ती व भंडारकुंमठा केंद्रातून आलेले विविध सहशिक्षक आणि बालगोपाल यांनी उपस्थिती लावली होती. श्रीमती रत्नमा यांनी प्रार्थना गीत गायिले. कलिका हब्बा 2024-25 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण श्रीमती वैभवी कुलकर्णी केंद्रप्रमुख भंडारकुमठा यांनी सादर केले. यानंतर आलेल्या पाहुण्यांचा कलिका टोपी, तिरंगी झेंडा, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर नैनोद्दीन विस्तार अधिकारी औराद बी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या सोबतच प्रकाश बर्दापुरे यांनी सर्व भंडारकंठा केंद्रातील शाळा व मुख्याध्यापक यांच्यावर सुंदर अशी कविता सादरीकरण केले. त्या सोबतच रणजीत शिंदे यांनी देखील आपले अनमोल विचार मांडले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून एक छोटीशी कविता सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैभवी कुलकर्णी केंद्रप्रमुख भंडारकुमठा यांनी केले,या नंतर तालुका स्तरीय शिवजयंती भाषण स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक आलेली सरकारी उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील विद्यार्थिनी कु. पूजा पांडुरंग कोंगळे, यात भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेली कु. गायत्री तानाजी बिराजदार या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्या सोबत वाचन स्पर्धा ,शुद्धलेखन स्पर्धा, अंकगणित स्पर्धा, मेमरी टेस्ट, कथा सांगणे स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आले. आणि प्रथम, द्वितीय ,तृतीय स्पर्धक काढून त्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक सतीश मुळे ,सहशिक्षक जगन्नाथ, रियाजुद्दीन त्यासोबत मुख्याध्यापक राजकुमार नाईकवाडे,संजू आडे ,विठ्ठल दिंडगिरे,विठ्ठल राठोड ,राम बिराजदार ,जयश्री बिराजदार, जयपाल राठोड ,श्रीनिवास जाधव ,अनिता पांढरे ,विनायक वजीरे ,दयानंद कोल्हेवाड, संजू बोडके ,सुरेंद्र रानडे, अशोक जाधव, मारूती चव्हाण या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम सुंदर रीतीने पार पडला. या कार्यक्रमाचे आभार श्रीराम बिराजदार यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!