उमरगा येथील महाआरोग्य शिबिरात दहा हजार रुग्णांच्या तपासणीसह औषधोपचार

0
उमरगा येथील महाआरोग्य शिबिरात दहा हजार रुग्णांच्या तपासणीसह औषधोपचार

मुरुम (एल.पी.उगीले)
भाजपा युवानेते शरण पाटील यांचे पुढाकारातून आयोजित दोन दिवसीय विभागीय महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात लातूर, धाराशिव जिल्ह्यातील दहा हजार पाचशे विविध आजाराच्या रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले.
येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात या शिबिराची सुरुवात माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, प्रदीप राठी, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे इत्यादी मान्यवर महाआरोग्य शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री खुबा म्हणाले, शरण पाटील यांनी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील आणि बापूराव पाटील यांच्या सामाजिक व राजकिय कार्याची परंपरा कायम ठेवली आहे. शरण पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून विविध आजाराच्या दहा हजार रुग्णांना आधार मिळाला. केंद्र व राज्य सरकार सामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
शिबिरांतर्गत लाभार्थीना स्वाभिमान भारत या योजनेचेची नोंदणी करून देण्यात येत आहे. शरण पाटील फाउंडेशनच्या लोगोचे विमोचन करण्यात आले.
या महाआरोग्य शिबिरात विविध आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. प्रा. डाँ.शौकत पटेल, प्रा.डॉ. लक्ष्मण बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!