गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या 6 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
उदगीर (एल.पी.उगीले)
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे नुकत्याच राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा पार पडल्या .या स्पर्धेमध्ये गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. ते खालील प्रमाणे खेळाडू आहेत .जानवी बाबाराव पवार ( इंडियन राउंड प्रकारामध्ये )प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे .
भारती बाबाराव पवार ( रिकर्व राऊंड) प्रकारामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. कल्याणी हरीदेव पवार (कंपाउंड राउंड ),तनवी कामठी (इंडियन राऊंड प्रकारामध्ये ),सुयश गदादे (कंपाउंड राऊंड प्रकारामध्ये ),
अद्वैत शिर्के( कंपाऊंड राऊंड प्रकारामध्ये ) या सर्व खेळाडूंची निवड आंध्रप्रदेश मधील गुंटूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
या स्पर्धा 20 मार्च ते 30 मार्च या कालावधीत पार पडरणार आहेत .
त्याच बरोबर भारती आणि जान्हवी ने या स्पर्धेमध्ये दुहेरी पदक पटकावले आहे.भारती ने ओव्हर ऑल रोपे पदक प्राप्त केले .
त्याचबरोबर इंडिव्हिजल एलिमिनेशन मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आणि त्याचबरोबर भारतीची मोठी बहीण म्हणजे जानवी पवार ने ओव्हर ऑल सुवर्णपदक आणि इंडिव्हिजल एलिमिनेशन सुवर्णपदक असे पदके प्राप्त करून या दोन सख्या बहिणींनी आपल्या जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहेत. हे सर्व खेळाडू गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत असून त्यांना मुख्य प्रशिक्षक सुधीर पाटील ,सुषमा पवार ,मारोती बिरादार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी लातूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे ,सचिव अशोक जंगमे ,
राजेश देवकर , नवनाथ गरगटे क्रीडा प्रेमी भास्कर पाटील ,गजानन पवार ,विशाल जाधव ,यमुनाजी भुजबळे , उमाकांत भेदे ,खलीखान पठाण,महेंद्र बिराजदार , जिलानी शेख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
