राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेत दादा ग्रुप उमरगा विजेता

0
राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेत दादा ग्रुप उमरगा विजेता

उमरगा(एल.पी.उगीले) येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस धाराशिव जिल्हा अध्यक्ष अश्लेश भैया शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त धाराशिव चॅम्पियन कबड्डी लीग- राज्यस्तरीय भव्य खुली कबड्डी स्पर्धा 2025 संपन्न झाली. स्पर्धेत शहरी खुल्या गटातून दादा ग्रुप उमरगा चा संघ विजेता ठरला.
या स्पर्धेत राज्यभरातील एकूण 41 संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. कबड्डी या मैदानी खेळाबद्दल युवकांमध्ये आकर्षण वाढावे या हेतूने अश्लेश भैय्या मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यस्तरीय भव्य खुली कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी आणि भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
ही कबड्डी स्पर्धा शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांमध्ये घेण्यात आली. शहरी विभागातून रुपये 71 हजाराचे प्रथम पारितोषिक दादा ग्रुप उमरगा या कबड्डी संघाने पटकावून हा संघ धाराशिव चॅम्पियन कबड्डी लीग चा विजेता ठरला. द्वितीय पारितोषिक रुपये 61 हजाराचे स्वयंभू कबड्डी संघ अकलूज या संघाला मिळाले, तृतीय पारितोषिक रुपये 25 हजार रुपयांचे जयंत पाटील स्पोर्ट्स क्लब इस्लामपूर या संघाला मिळाले तर चौथे उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 21 हजाराचे स्वराज स्पोर्ट क्लब भूम (ग्रुप ब) या संघाला मिळाले. ग्रामीण विभागातून प्रथम पारितोषिक रुपये 31 हजार सेव्हन स्टार कबड्डी संघ धाराशिव या संघाने पटकावून हा संघ ग्रामीण विभागातून विजेता ठरला. ग्रामीण विभागात द्वितीय पारितोषिक रुपये 21000 सेवाभावी कबड्डी संघ बलसुर या संघाला मिळाले. रुपये 15000 चे तृतीय पारितोषिक छावा स्पोर्ट्स क्लब उमरगा (ग्रुप ब) या संघाला मिळाले, तर उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 11000 चे छावा स्पोर्ट्स क्लब उमरगा (ग्रुप अ) या संघाला मिळाले. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिकही देण्यात आली. उत्कृष्ट चढाईपट्टू हे रुपये 5000 चे पारितोषिक दादा ग्रुप उमरगा या संघाच्या सुग्रीव पुरी या खेळाडूला मिळाले. तर रुपये तीन हजाराचे ग्रामीण विभागातील उत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक स्वराज क्लब भूमच्या निलेश वरे या खेळाडूला प्राप्त झाले. तर शहरी विभागातील उत्कृष्ट खेळाडू हे रुपये पाच हजाराचे पारितोषिक अकलूज येथील सुरज कुमरखेड या खेळाडूला मिळाले. तर उत्कृष्ट पकडपट्टू हे रुपये पाच हजाराचे पारितोषिक श्री साई कबड्डी संघ नाशिकच्या हर्षल काळे या खेळाडूला मिळाले.
स्पर्धेतील विजेत्यांना उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार माननीय प्रवीण स्वामी आणि भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांच्या हस्ते बक्षीसाची रक्कम आणि ट्रॉफी करण्यात आली. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे, संचालक रामभाऊ माने,रामराव इंगोले, तानाजी फुकटे, अशोक पाटील, दिगंबर बिराजदार, विजयकुमार सोनवणे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार,नानाराव भोसले, विजयकुमार नागणे, डॉ. विजय बेडदुर्गे, डॉ अनिकेत इनामदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ . विलास इंगळे आणि डॉ पद्माकर पिटले, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी अश्लेष भैया मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल कानेकर, अशोक ममाळे ,नितीन कोराळे, अरविंद पाटील, संतोष चौधरी, जयवंत मोरे, नितीन राठोड, व्यंकट पवार, अमोल बंडे, अमित रेड्डी, अर्जुन बिराजदार आदींनी पुढाकार घेतला आहे.
यासाठी तालुक्यातील क्रिडा शिक्षक
प्रा. विजय पवार, डॉ, राजू सूर्यवंशी, प्रा जी बी गायकवाड, राजेंद्र सोलंकर, संजय कोथळीकर, मुनीर शेख, गोविंद जाधव, सुरेंद्र वाले, राजेंद्र सगर, विश्वजीत दुबे, आनंदराज बिराजदार, संतोष राठोड, राजेंद्र पाटील, बाबुराव पवार, विश्वजीत दुबे, विक्रांत मोरे, हिरालाल गायकवाड, नारायण सोलनकर, ज्ञानेश्वर बिराजदार, अनिल मदनसुरे, डॉ ए सी पाटील, यानी पुढाकार घेतला.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ढोणे आणि प्रास्ताविक आणि आभार डॉ संजय अस्वले यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!