ग्रामस्थांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – मेडेवार

0
ग्रामस्थांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा - मेडेवार

उदगीर (एल.पी.उगीले);- महाराष्ट्र शासन विभागीय आयुक्त कार्यालय विकास शाखा छञपती संभाजी नगर यांच्या संकल्पनेनुसार पंचायत समिती जळकोट व ग्रापंचायत कार्यालय ढोरसांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवस गावक-या सोबत ( ग्राम दरबार) एक नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरसांगवी शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समिती जळकोट चे गट विकास अधिकारी मेडेवार यांच्यासह तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपापल्या विभागाच्या शासकीय योजना कोणकोणत्या आहेत, व त्या कशा राबवायच्या याविषयी सर्वांनी सविस्तर अशी माहिती उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना सांगितल्या. यामध्ये शिंदे विस्तार अधिकारी पं. स.जळकोट, पटवारी विस्तार अधिकारी पं. स.जळकोट ,शेळके व घोलप ( जे. ई. पाणी पुरवठा विभाग),के.पी.बिरादार ( शिक्षण विस्तार अधिकारी),माधवराव हंगरगे ( कें.प्र.), काशिम शेख ( टी.एच. ओ. पं. स.जळकोट ), श्रीमती आकनगिरे ( अंगणवाडी पर्यवेक्षिका ),श्रीमती देवणे यु.आर.(आशा पर्यवेक्षिका) भगवान अंकुश ( तालुका अभियान व्यवस्थापक – उमेद ) कलमे जी.व्ही., वाघमारे एम.एम.( एस.बी. एम.तालुका समन्वयक),शिवराज स्वामी (म.न.रे.गा.), शेवटे (ग्रामसेवक) आदी नी सविस्तर माहिती सांगितली. तर शेवटी गट विकास अधिकारी मेडेवार यांनी सर्व विभागाचा आढावा घेऊन गावातील महिला ,पुरुष ,तरुण, व अल्प बचत गटाच्या महिलाना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन केले.तत्पूर्वी या मान्यवरांचे ढोरसांगवी शाळेच्या विद्यार्थिनीनी ढोल – लेझिम ने स्वागत केले तसेच स्वागत गीत व साक्षरतेचे गीत साभिनय सादर केले, तर शिक्षण विभागाने शाळेची तपासणी करून निबंध स्पर्धा घेतली व प्रथम,द्वितीय, व तृतीय येणाऱ्या विध्यार्थ्यांना गटविकास अधिकारी मेडेवार त्यांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ढोरसांगवी गावच्या सरपंच श्रीमती सोक्शा दिलीप सोनकांबळे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी मेडेवार, व सर्व विभागाचे प्रमुख होते. तर उपस्थितांमध्ये उपसरपंच परमेश्र्वर पोतणे, ग्रामसेवक केशव शेवटे,दिलीप सोनकांबळे,चेअरमन माधव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग पोतने,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पोतने, मुख्याध्यापक सुरेश गुरमे, जी.टी.मुंडे,ज्ञानोबा टेकले, सुवर्णा नलाबले मॅडम,जेष्ठ नागरिक डोलारे ,शिवाजी पाटील,आनंद पांचाळ, पदमावती पाटील,अंगणवाडी कर्मचारी निमाताई जाधव, लाईनमन शामराव आगलावे, विद्यार्थी,तरुण ,महिला पुरुष आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जी.टी मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भूमिपुत्र व फार्मा प्रोडूसर कंपनी चे विशाल पाटील यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!