प्रा. डॉ. बालाजी होकरणे यांना विद्यापीठाचा लघु संशोधन प्रकल्प मंजूर
उदगीर : (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वाणिज्य शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी होकरणे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने वाणिज्य शाखेतून लघु संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. ‘एम्प्लॉयबिलिटी स्किल्स अमंग ग्रॅज्युएट स्टुडंट्स : अ कम्पेरेटिव्ह एनालिसिस ऑफ इंडस्ट्री डिमांड अँड ग्रॅज्युएट एट्रीब्यूटस इन लातूर डिस्ट्रिक्ट’ या विषयावर संशोधन कार्य करण्यासाठी विद्यापीठाने मान्यता दिली आहे. या महत्वपूर्ण संशोधनामुळे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी आणि उद्योग यांच्यातील तफावत समजून घेण्यास मदत होईल. तसेच, शैक्षणिक संस्थांनी उद्योग-आधारित प्रशिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम आणि करिअर गाइडन्स वाढविण्यासाठी काय सुधारणा कराव्यात याबद्दल दिशा मिळू शकेल. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
