नैसर्गिक शेती करणे काळाची गरज – श्रेयश यादव

0
नैसर्गिक शेती करणे काळाची गरज - श्रेयश यादव

उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील
मौजे गुडसूर येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापित गटातील सदस्यांना निविष्ठा निर्मिती ड्रम चे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नैसर्गिक शेती करणारे प्रगतीशिल शेतकरी मेघराज मुडपे होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयस यादव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉ. प्रफुल पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर हे होते.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा नितीन दुरुगकर यांनी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत तालुक्यात गटस्थापना कशी केली? व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांची पुढची वाटचाल कशी असेल? याबद्दल संपूर्ण माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
प्राध्यापक डॉ. प्रफुल पाटील यांनी गो वंशाचे महत्व, गो वंशाचा संगोपन व नैसर्गिक शेतीमध्ये गो वंशाची गरज, गो आधारित शेती , रोग प्रतिकार क्षमता कमी होण्याची कारणे व प्रत्यक्ष शेतकऱ्याने पशुपालन का करावे? या संबंधित सविस्तर माहिती दिली.
उद्घाटन प्रसंगी बोलताना उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयस यादव यांनी नैसर्गिक शेती काळाची गरज बनली असून जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क, कंपोस्ट खत, गांडूळ खत अशा सेंद्रिय निविष्ठा वापरून आपल्याला शेतीतला खर्च कमी करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल? याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके इत्यादीचा अतिवापरामुळे बिघडलेला जमिनीचा पोत सुधरवायचा असेल तर नैसर्गिक शेती शिवाय दुसरा पर्याय नाही. घातक रसायनामुळे आपल्या शरीरावरील विपरीत परिणाम होत असून शुगर, बीपी, कॅन्सर यासारख्या रोगांना आपण बळी पडत आहोत, आपली प्रतिकार क्षमता वाढवायची असेल तर नैसर्गिक पद्धतीने शिजवलेल्या अन्नाचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे. अन्यथा आपले आरोग्य व शेतीचे आरोग्य घसरल्या शिवाय राहणार नाही, असे सांगितले.
कृषी सहाय्यक दर्शन केंद्रे यांनी कृषि विभागाच्या अन्य योजना, अग्रीस्टेट, महाडिबिटी, फळबाग लागवड, पाणलोट कार्यक्रम बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रगतशील शेतकरी रत्नाकर बिरादार, पिंपरी यांनी नैसर्गिक शेतीतील आपल्या अनुभवा द्वारे नैसर्गिक शेती का करावी, व कशी करावी? याबाबतचे आपले स्व अनुभव उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले, आजच्या काळात श्रीमंती ही पैशाची नसून शरीराचे स्वास्थ्य सुदृढ असणे हीच खरी श्रीमंती आहे. त्यामुळे कमीत कमी आपल्या घरच्यांचे आरोग्य सुधारण्याकरता नैसर्गिक शेती करावी, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
तालुक्यात स्थापन झालेल्या मल्लेश्वर नैसर्गिक शेतकरी गट, किणी चे अध्यक्ष बाबुराव नारागुडे, प्रगती नैसर्गिक शेतकरी गट, मोर्तळवडी चे अध्यक्ष गणपत भोसले, सावली नैसर्गिक शेतकरी गट, पिंपरी चे अध्यक्ष रत्नाकर बिरादार, पांडुरंग नैसर्गिक शेतकरी गट, लिंबागाव चे अध्यक्ष जितेंद्र शेळके, बळीराजा नैसर्गिक शेतकरी गट, हांदर्गुळी चे अध्यक्ष अमोल भोसले, गुरुकृपा नैसर्गिक शेतकरी गट, सताळा चे अध्यक्ष रामेश्वर उलागड्डे यांना गटाचे नोंदणी प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला मंचावर मंडळ कृषी अधिकारी देवर्जन कु. प्रज्ञा सपकाळ, सतीश भांडेकरी, कृषी सहाय्यक, नळगिर,सरपंच उत्तम सूर्यवंशी, सोसायटी चेअरमन कालिदास दंडीमे, सोसायटी व्हॉईस चेअरमन अनिल लांजे , माऊली ॲग्री फार्मर प्रोडूसर कंपनी, गुडसूर चे अध्यक्ष अविनाश वळसे, प्रगतशील शेतकरी माधव मलकंपट्टे, गोपाळ हेलंबे, नागेश नवांडे, सोपान मुस्कावड, गुंडेराव हेळंबे, विश्वनाथ होळसंबरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन संदिप अंधारे तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले. तर आभार प्रदर्शन माधव टेपाले यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!