रेनबो पब्लिक स्कूलचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) शहरातील देगलूर रोड येथील राधे कृष्ण नगर मधील रेनबो प्रि.प्रायमरी पब्लिक स्कूलच्या वतीने विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.
या वेळी या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन बालरोगतंज्ञ डाॅ. विठ्ठल चामवाड व राष्ट्रवादी काॅग्रेस पाटीॅचे नेते नवनाथ गायकवाड यांच्या हस्ते सपन्न झाले.
या वेळी स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोग बनऊन आनले होते. व व्यवस्थित सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी प्रयोगाची व्यवस्थित मांडनी करुन माहीती सांगीतली. वैज्ञानीक प्रातिक्षके दाखवली.
या वेळी प्रमूख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी शिक्षक संघाचे शहर अध्यअ बाबासाहेब पाटील , संस्था अध्यक्ष विनोद गुरमे, प्राचार्या अनुराधा गुरमे, शिवाजी मानकोळे , सतिश कच्चे व पालक उपथित होते.
या वेळी शाळेतील शिक्षिका मिताली ढेगे,दिपाली परगे,पुनम स्वामी व कर्मचारी यानी परीश्रम घेतले.
