निबंध स्पर्धेत शारदा स्कूलचे यश

निबंध स्पर्धेत शारदा स्कूलचे यश

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत येथील शारदा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे प्रशासक एल. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्यावतीने शाळेला स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गुणवंतांचे रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांनी विशेष कौतुक केले.गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आर्या जाडे, आदित्य मोरे, श्रेया देशमुख, उजेर सय्यद, वसुधा वाघमारे, श्रद्धा भारती, अमन पठाण, साहित्या माचिरेड्डी यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना मराठी विभाग प्रमुख मेघा जगदाळे, विषय शिक्षक दिगंबर सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शाळेचे प्राचार्य कैलास जाधव, समन्वयक वैशाली गिरवलकर, शीला शेळके, विलास गायकवाड, रेहमत सय्यद उपस्थित होते. सूत्रसंचालन सायली मेनकुदळे यांनी केले.

About The Author