पशुवैद्यकीय महाविद्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) येथील पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी भूषविले.
हे आरोग्य शिबिर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. शासकीय रुग्णालयातून डॉ. पांडुरंग दोडके, डॉ. बस्वराज स्वामी आणि डॉ. गजेंद्र राठोड यांनी या शिबिरात सहभाग घेतला. डॉ. प्राजक्ता जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी आणि पशुसखींना त्यांच्या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी आवाहन केले. उदगीरच्या सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी महिलांच्या दैनंदिन जीवनात पौष्टिक आहाराचे महत्त्व विशद केले.
या शिबिरात 40 विद्यार्थ्यांनीची आणि 25 पशुसखींची हेमोग्लोबिन, रक्तदाब आणि शुगर तपासणी करण्यात आली.
