संत ज्ञानेश्वर माऊली प्रा.विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.

0
संत ज्ञानेश्वर माऊली प्रा.विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.

उदगीर (एल.पी.उगीले) येथील संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालय प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षक सुमित्रा इलमले,डॉ. सुलोचना येरोळकर, साहित्यीक डॉ.अश्विनी निवर्गी, तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक शर्मिला बिरादार , विद्या शिवाजी पवार ,स्वाती इंद्रजित गवळी या उपस्थित होत्या
मुख्याध्यापिका सौ जगताप अनिता यांच्या संकल्पनेतून महिलांचा सन्मान दिन म्हणून महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात आपले कर्तव्य बजावून देशाचा मान सन्मान व देशाचे नाव उंचावून नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या महिलांची वेशभूषा सादर करून त्यांच्या विषयी माहिती सांगितली. तसेच मुलींनी सामाजिक प्रबोधन पर नाटक सादर करून उपस्थित सर्वांचीच मने जिंकली. या नाटकातून आजची स्त्री काय काय करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!