समर्थ विद्यालयात जागतिक महिला दिन.

0
समर्थ विद्यालयात जागतिक महिला दिन.

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी साहित्यिक रसूल पठाण उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.के. डी. मुडपे, गंगुबाई अंबादास कंजे, पुष्पांजली बालाजी हालगे, अर्चना दिलीप जाधव, सुलोचना श्रावण कांबळे, महानंदा राम शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मा जिजाऊ, व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. मुडपे यांनी इतिहासातील कर्तृत्ववान महिलांचे दाखले देऊन आजची स्त्री देखील मागे नसल्याचे सांगितले. तर अध्यक्षीय समारोपात रसुल पठाण यांनी आजची महिला आपल्या कामातून, कर्तृत्वाने आपले नेतृत्व सिद्ध करून दाखवत आहे, यामुळे कुटुंबातच नाही तर समाजातही मान सन्मान मिळत आहे. प्रास्ताविक वर्षा कवडगावे यांनी केले. सुत्रसंचालन अनुष्का गडदे हिने केले. तर आभार सोनाक्षी कांबळे हिने मानले. यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!