चांगल्या आरोग्यासाठी आहारात विटामिन्सचा समावेश करा – प्रा. रेखा देशमुख

0
चांगल्या आरोग्यासाठी आहारात विटामिन्सचा समावेश करा - प्रा. रेखा देशमुख

उदगीर (एल.पी.उगीले) :विद्यार्थिनींना आरोग्यासाठी व भविष्यात होणाऱ्या आजारांना टाळण्यासाठी आहारात आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन खूप महत्त्वाचे असतात.चांगल्या आरोग्यासाठी विटामिन्सचा समावेश करा. असे प्रतिपादन कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय येथील गृह विज्ञान विषयाच्या विभाग प्रमुख प्रा. रेखा देशमुख यांनी केले आहे.
त्या येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून समाजशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे’ आरोग्य व आहार’ या विषयावर विशेष व्याख्यानात बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे होते, तर व्यासपीठावर प्रा.मनीषा पाटील, प्रा. शकुंतला जाधव, प्रा. शुभांगी पावडे उपस्थित होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, व्हिटॅमि ‘डी’बरोबरच महिलांना व्हिटॅमिन के ची अतिशय आवश्यकता आहे .यासाठी मुलींनी रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, सोयाबीन, मसूर, सुकामेवा, पालक, ब्रोकोली अशा बाबी समाविष्ट केल्या पाहिजे. व्हिटॅमिन बारा चे महत्त्व सांगताना आधुनिक काळात मुलींना या व्हिटॅमिन ची कमतरता भासत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
अध्यक्ष समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे यांनी विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व सांगितले, सशक्त महिला होण्यासाठी उत्तम आहार आवश्यक आहे, असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनुराधा पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. यु.के. सिरसी यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!