शिक्षणानेच महिलांचा उद्धार शक्य -बारसंगे
उदगीर (एल.पी.उगीले)
‘ महिला शक्ती ही सर्वश्रेष्ठ असून शिक्षणानेच महिलांचा उद्धार शक्य ‘असल्याचे मत शिक्षण विस्तार अधिकारी गोविंदराव बारसे यांनी व्यक्त केले. चांदेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सुधाकर मुसने होते तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव वाघमारे, विठ्ठल म्हेत्रे, मुसने , मु.अ. संजय मोघेकर उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. निळकंठ पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण हेच मानवी परिवर्तनाचे साधन असून शिक्षणात परिवर्तनाची मोठी ताकद असल्याचे मत बारसंगे यांनी पुढे बोलताना व्यक्त केले.
शैक्षणिक प्रगती हा समृद्धीचा मार्ग असून या मार्गावर चालून महिलांनी प्रगती साध्य करावी असे आवाहन सरपंच सुधाकर मुसने यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी श्रीमती रुपा बासरकर, कविता बिरादार,शाहुताई म्हेत्रे, प्रीती देवनाळे, पद्ममीनबाई म्हेत्रे, मयुरी मिरकले यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती रुपा बासरकर, कविता बिरादार, प्रीती देवनाळे यांनी मनोगत व्यक्त केले. धनंजय गुडसूरकर यांनी सूत्रसंचालन तर संजय मोघेकर यांनी आभार मानले.
