महिला सक्षमीकरण काळाची गरज – प्रा. शिलादेवी कांबळे
उदगीर (एल.पी.उगीले) समाजाची खरी जडणघडण ही सुशिक्षित महिले कडूनच होत असते. त्यामुळे महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. किंबहुना ती काळाची गरज आहे. असे विचार प्रा.शिलादेवी कांबळे यांनी व्यक्त केले. त्या उदगीर येथील कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात महिला दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,यांच्या प्रतिमेची पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.
पुढे बोलताना प्रा कांबळे म्हणाले की,शहराबरोबरच खेड्या पाड्यातील महिलांबाबत अनेक प्रश्न आजही उद्भवत असतात. तेथूनही सक्षमीकरण होणे गरजेचे आहे.
सत्कारमूर्ती डॉ प्राजक्ता पाटील यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रत्येक मुलीने उच्च शिक्षण घेतलेच पाहिजे असे आपल्या विचारातून व्यक्त केले. संस्थेच्या कोषाध्यक्षा मृदुला ताई पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष समारोत डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की, आजची मुलगी मुलाबरोबर प्रत्येक क्षेत्रात सक्रिय झाली पाहिजे असे सांगितले. डॉ.प्राचार्य ओमप्रकाश क्षीरसागर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा रेखा लोणीकर देशमुख यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुरेखा दाडगे, आभार डॉ. हिरा मोरतळे यांनी केले.
