संत तुकाराम लॉ कॉलेज उदगीर येथे जागतिक महिला दिन उत्साहात
उदगिर (एल.पी.उगीले)
संत तुकाराम लॉ कॉलेज येथे सावित्रीबाई फुले व मदर तेरेसा यांच्या प्रतिमेचे पूजन करून, दिप प्रज्वलन करून, कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिप्ती राजकुमार नावंदर या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड. प्रेरणा गायकवाड,अँड प्रिया नारखेडे उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते यांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्षम होण्याचे आवाहन केले. या प्रसंगी प्रा. अश्विनी पाटील, प्रा. मिना केंद्रे, प्रा. आरूषा गायकवाड, प्रा. प्रिती कांबळे, यांनी तसेच कांबळे रिना, चव्हाण मिताली, आळंदीकर वैष्णवी, मगर धनश्री, स्वामी रेवती,गोरे रोहिणी, शिंदे पुजा,काळे अंकीता, वाघमारे किरण, कांबळे शुभांगी या विद्यार्थ्यांनिंनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन प्रा. जयवर्धन भाले यांनी तर अध्यक्षीय समारोप व आभार प्रदर्शन प्रा. दिप्ती नावंदर यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय कांबळे, प्रा. संतोष सुभेदार, प्रा. विनायक शिंदे, प्रणव गायकवाड, संभाजी कांबळे, निळकंठ कानवटे,लक्ष्मीकांत डोईजोडे, यांनी प्रयत्न केले.
