उदयगिरीत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
उदगीर : (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य प्रा. मनोहरराव पटवारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, कार्यकारिणी सदस्य बसवराज पाटील नागराळकर, महादेव नौबदे, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. शंकर हल्लाळे, प्राध्यापक सचिव डॉ. भालचंद्र करंडे, दिनविशेष समिती प्रमुख डॉ. गौरव जेवळीकर यासह अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती.
