गरीबांच्या उन्नतीसाठी शेळीपालन एक वरदान – डॉ.नितीन पाटील
उदगीर (एल.पी.उगीले)
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर आणि राष्ट्रीय मांस अनुसंधान संस्थान, हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने “शास्त्रोक्त शेळीपालना व्दारे उद्योजक कौशल्य विकास” या विषयावर एकदिवसीय शेतकरी – शास्त्रज्ञ चर्चासत्रचे आयोजन किनवट, जि. नांदेड येथे डॉ.नंदकुमार गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद डॉ. नितीन पाटील कुलगुरू महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी भुषविले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस.बी.बारबुद्धे संचालक राष्ट्रीय मांस अनुसंधान संस्थान, हैद्राबाद तसेच डॉ. नितीन कुरकुरे , संचालक संशोधन, मपमविवि नागपूर, डॉ. अनिल भिकाने, संचालक विस्तार शिक्षण, मपमविवि नागपूर, डॉ.बसवा रेड्डी, प्रमुख शास्त्रज्ञ मांस अनुसंधान संस्थान, हैद्राबाद हे उपस्थित होते. पशुसंर्वधन विभागा तर्फे डॉ. नाना सोनावणे, प्रादेशिक पशुसंवर्धन, सह आयुक्त, लातूर विभाग डॉ.राजकुमार पडिले, नांदेड जिल्हा पशुसंवर्धन, उप आयुक्त, डॉ.प्रविणकुमार घुले, नांदेड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर चर्चासत्रात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरु यांनी शेळीपालन व्यवसायात अन्न सुरक्षा उपलब्ध करुन देण्याची शक्ती असल्याचे नमुद करत गरीबांच्या उन्नतीसाठी हे एक वरदान असल्याचे विशद केले. अशा प्रकारचे विविध प्रशिक्षण महाविद्यालय व विद्यापीठा मार्फत नियमीतपणे आयोजीत करण्यात येत असून सदर प्रशिक्षणाचा फायदा पशुपालकांनी करुन घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले.
डॉ. बारबुद्धे यांनी शेळीपालनांतील कौशल्य विकासाचे महत्व या विषयावर आपले मत मांडले. डॉ. अनिल भिकाने यांनी शेळीपालनातून उद्योजकता विकसीत करण्यावर भर दिला. शेतकरी – शास्त्रज्ञ चर्चासत्रमध्ये 272 अनुसूचित जमातीतील पशुपालकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली व या चर्चासत्रात शेळीपालनातील संधी, फायदे व शेळ्यांची विक्री, फायदेशीर शेळीपालनासाठी शेळ्यांच्या जातीची निवड,शेळ्यासाठी आहार व्यवस्थापन, शेळीपालन व्यवस्थापन व चारा उत्पादन,शेळ्यातिल आरोग्य व्यवस्थापन व रोग नियंत्रण, शेळ्यांसाठी मुरघास निर्मिती व चारा प्रक्रिया आणि शेळीपालनाबाबत शासनाच्या योजना या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नंदकुमार गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पी.व्ही. जाधव व आभार प्रदर्शन डॉ.जी.आर. चन्ना, प्रशिक्षण समन्वयक अनुसूचित जमाती उपयोजना यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजना करीता डॉ.जी.एम. गादेगावकर, डॉ. एन.व्ही. खोडे, डॉ. एल.एस कोकाटे, डॉ. व्ही. बी. डोंगरे, डॉ.व्ही.एन. खंडाईत, डॉ.पी.व्ही.पाटील यांनी अथक परिश्रम घेतले, तसेच डॉ. धोंड पशुधन विस्तार अधिकारी किनवट, डॉ.बागल पशुधन विकास अधिकारी, किनवट, जयराम कन्चर्लावार, संचालक, कृष्णाप्रिया गोशाळा किनवट व रोहीत वाल्हे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
