उदगीरमध्ये ‘धर्मवीर शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना – डॉ. विजय बिराजदार अध्यक्षपदी निवड

0
उदगीरमध्ये ‘धर्मवीर शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना – डॉ. विजय बिराजदार अध्यक्षपदी निवड

उदगीर (एल.पी.उगीले): धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उदगीर येथे व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत ‘धर्मवीर शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. समाजहित आणि धार्मिक कार्यासाठी समर्पित या ट्रस्टच्या अध्यक्षपदी सर्वानुमते डॉ. विजय बिराजदार यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
डॉ. विजय बिराजदार हे उदगीरमधील एक प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व समाजसेवक आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. बालपणापासून समाजसेवेची आवड असलेल्या डॉ. बिराजदार यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचा त्यांचा स्वभाव आणि प्रत्येकाशी कुटुंबासारखे वागवण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे.
डॉ. विजय बिराजदार यांना अध्यक्षपदी निवडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांवर आधारित सामाजिक व धार्मिक कार्य करण्याचा निर्धार ट्रस्टने व्यक्त केला आहे. भविष्यात समाजहिताचे अनेक उपक्रम आणि सेवाभावी कार्य या ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. निवडी प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे संतोषजी कुलकर्णी श्रीराम प्रतिष्ठानचे सतीश पाटील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!