महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे धिडवडे,बहुजन विकास अभियान च्या वतीने निषेध
उदगीर (एल.पी.उगीले) राज्यामध्ये अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत, मानवी हक्काची पायमल्ली केली जात आहे. अनेक ठिकाणी गोरगरिबांना, मजुरांना क्रूर वागणूक दिली जात आहे. या गोष्टीचा उदगीर येथील बहुजन विकास अभियान या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध नोंदवत प्रशासनाला निवेदन दिले आहे. उदगीर येथील उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देऊन उदगीर मध्ये मजूर तानाजी सोनकांबळे यांचा झालेला मृत्यू, परभणी मध्ये दहा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि जालना मध्ये धनगर समाजाच्या युवकांना झालेली बेदम मारहाण, या सर्व घटनेचा तीव्र निषेध करून यातील सर्व आरोपींना कठोर शासन केले जावे. तसेच सर्व पिडीतांना व त्यांच्या वारसांना पन्नास लाखाची मदत शासनाने करावी. अशी मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने करण्यात आली. या घटना मराठवाड्याला, महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत. अशा प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करून बंदोबस्त करावा. अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार, अजय मुंडकर, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती भाटकुळे, नामदेव बामणे, अनिल सोमवंशी, रवी पुदाले, अमोल सूर्यवंशी, रवी डोंगरे, गोरख वाघमारे, ब्रह्मानंद माळी, बालाजी गायकवाड, काशिनाथ गायकवाड, स्नेहल गोखले, शाहीर लक्ष्मीकांत, बनसोडे काशिना,थ पाटील महादेव, चंद्रकांत पाटील, पंकज गोखले आदी उपस्थित होते.
