आजची महिला आत्मनिर्भर बनली पाहिजे – डॉ.प्राजक्ता पाटील
उदगीर (एल.पी.उगीले) येथील कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी संस्थेच्या सदस्या प्राजक्ता पाटील यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की ,आजची समाजव्यवस्था लक्षात घेता महिलांच्या समोर अनेक प्रश्न दिसून येतात. त्यामुळे महिलांनी आपले रक्षण स्वतःच करणे आवश्यक आहे. व प्रत्येक प्रश्नांना सामोरे स्वतःलाच जावे लागते. त्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बनली पाहिजे, असे आपल्या मनोगत मांडले .
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालया तर्फे स्वागत करण्यात आले. यानंतर प्रा. शिलादेवी कांबळे यांनी हे आपले मनोगत व्यक्त केले.
त्यांनी सांगितले, प्रत्येक मुलगी उच्चशिक्षित झाली पाहिजे. संस्थेच्या कोषाध्यक्षा मृदुला पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ.विजयकुमार पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात आजची मुलगी प्रत्येक क्षेत्रात प्राविण्य मिळविली पाहिजे, व सक्षम बनली पाहिजे. असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. रेखा देशमुख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुरेखा दाडगे तर आभार डॉ. हिरा मोरतळे यांनी केले .
