शास्त्री विद्यालयाची आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रभेट
उदगीर, (एल.पी.उगीले) येथील लाल बहादूर शास्ञी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात अग्निशमन दल उदगीर या ठिकाणी क्षेत्रभेट दिली.
विद्यार्थ्यांना तेथील कार्यप्रणालीची तसेच साहित्यांच्या हाताळणीबाबत माहिती देण्यात आली.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक बालासाहेबजी केंद्रे, पर्यवेक्षक किरण नेमट यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडाशिक्षक संतोष कोले यांच्या पुढाकारातून क्षेत्रभेट संपन्न झाली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक गुरुदत्त महामुनी, विद्यालयातील कर्मचारी श्रीमती झुंमुबाई डांगे यांचे चिरंजीव शिवशंकर रावळे तसेच अग्निशामन विभागाचे अधिकारी राजकुमार चामले तसेच तेथील कर्मचारी यांनी सदर कार्यप्रणालीची, यंत्रणेची प्रात्यक्षिके करून सखोल माहिती तसेच साहित्य हाताळणीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
अतिशय आनंदी वातावरणात ही क्षेत्रभेट संपन्न झाली. याबद्दल मुख्याध्यापक केंद्रे यांनी तेथील अधिकारी वर्गाचे विद्यालयाच्या वतीने आभार मानले.
