छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने अभिवादन
उदगीर (एल.पी.उगीले)
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान ट्रस्ट उदगीर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान ट्रस्ट च्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ता सतीश पाटील मानकीकर, सामाजिक कार्यकर्ते बी.जी.शिंदे, शुभम गायकवाड, शुभम बिरादार, अमित पले, गणेश जाधव-पाटील, पवन घोगरे, विठ्ठल घोगरे, शिवम बावगे, श्रेयस सूर्यवंशी, अजय शिंदे, व्यंकटेश शिंदे, मयुरी शिंदे यांनीही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
