जागतिक महिला दिनानिमित्त कर्करोग जनजागृती रॅली

0
जागतिक महिला दिनानिमित्त कर्करोग जनजागृती रॅली

उदगीर (एल.पी.उगीले) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने उदगीर शहरातून कर्करोग जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील विविध संस्था व सामाजिक संघटनाच्या महिलांनी सहभाग नोंदविला.
उदगीर शहरातील हुतात्मा स्मारका पासून ही रॅली सुरु करण्यात आली. हुतात्मा स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शाहू महाराज चौक ते माहेर हॉस्पिटल, बस स्टॅन्ड समोर अशी रॅली काढण्यात आली. रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये रोटरी क्लबसह इनरव्हील क्लब, मातृभूमी महाविद्यालय, स्वामी विवेकानंद फार्मसी अँड नर्सिंग कॉलेज, स्त्रीरोग तज्ञ संघटना, प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आदी संस्था व सामाजिक संघटनाच्या महिला पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, सचिव ज्योती चौधरी, विद्या पांढरे, सुनीता मदनूरे, प्रा. मंगला विश्वनाथे, डॉ. सुलोचना येरोळकर, मातृभूमीच्या प्राचार्या उषा कुलकर्णी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मानसी चन्नावार, सचिव पल्लवी मुक्कावार, प्रिया नारखेडे, स्वाती गुरुडे, रोहिणी चाटे, तुलसी देशमुख, राणी वैजापुरे, स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या डॉ. प्राजक्ता गुरुडे, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा लेंडाणे यांच्यासह महिला व युवतींची मोठी उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!