मॉर्डन ग्रुपचा सामाजिक उपक्रमउदगीरात रमजान सहेरीला पहाटे 2 ते 5 वेळेत मोफत सेवा.
उदगीर (एल.पी.उगीले) शैक्षणिक , व्यावसायिक केंद्र असलेल्या उदगीर शहरात शिक्षणासाठी व इतर कामांसाठी बाहेरुन येणाऱ्याची संख्या मोठी आहे.रमजान महिन्यात उपवास ठेवता यावा, या उद्देशाने पहाटे 3ते 5 यावेळेत मोफत सहेरी करण्यासाठीची संकल्पना सईद साबेरी यांच्या परिवारा समोर आली. आपल्या हातून काही तरी चांगले घडावे, गरजूंना सेवा देता यावी, यासाठी त्याचे हात मदतीसाठी पुढे सरसावले आहे. खतीबान मशिद खतीब कॉलनी येथील हॉटेल निजामुद्दीन या ठिकाणी मॉर्डन यांच्या ग्रुपकडून सुरु असलेल्या या उपक्रमाचा अनेकांना लाभ होत आहे. खतीबान मशिद परिसरातील रमजान महिन्यात पहाटेच्या सहेरसाठी जेवनाची सोय नव्हती. पहाटे शहरात कुठेही ना हॉटेल सुरु राहतात, ना फळांचे स्टॉल ! पहाटेच्या सहेरीची गैरसोय लक्षात घेऊन त्यांना पहाटेच्या सहेरसाठी जेवणाचे डबे मिळत नसावेत, असा विचार पुढे आला. जेवणाच्या डब्याअभावी त्यांना उपवास सुटणार नाही याची काळजी घेत उदगीर शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले. या शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्यात आली.
पहाटे 3 वाजता जेवन तयार झाल्यानंतर 5 वाजे पर्यंत येथे अनेक तरुण काम करत आहेत.स्वयंपाक बनविण्यासाठी ६ जण, भाजीपाला कट करुन देणे, मटेरिअल उपलब्ध करून देण्यासाठी टीम बनविण्यात आल्या आहेत. नॉनव्हेज चे पोट भरून जेवण . केळी. चहा दिले जाते. मॉर्डन ग्रुपच्या वतीने संपूर्ण रमजानच्या पवित्र महिन्यात साबरी परिवाराच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या संकल्पनेची उदगीर शहरात मोठ्या कौतुकाने चर्चा केली जात आहे.
मागणीनुसार उदगीर शहरातील विविध रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनाही डब्याची होते. रमजान महिन्यात उपवास करणाऱ्या लोकांबरोबर दवाखान्यात उपचारासाठी आलेले रुग्ण व त्यांच्या
नातेवाईकांनी डब्यांची मागणी केल्यास त्यांना डबे दिले जातील अशी माहिती मॉर्डन ग्रुपचे सर्वश्री सईद साबेरी यांनी दिली आहे. जेवणासाठी गैरसोय होणार नाही याची खबरदारी हा ग्रुप घेत आहे. तसेच ही संकल्पना भविष्यकाळातील प्रत्येक रमजानच्या पवित्र महिन्यात राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
