पशुवैद्यकीय शास्त्राचा उपयोग समाजकार्यासाठी व्हावा – डॉ. नंदकुमार गायकवाड

0
पशुवैद्यकीय शास्त्राचा उपयोग समाजकार्यासाठी व्हावा – डॉ. नंदकुमार गायकवाड

उदगीर (एल.पी.उगीले) पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर व वर्ल्ड वाईड व्हेटेरीनरी सर्व्हिसेस, युके यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्वान निर्बिजीकरण कार्यक्रम’ या विषयावर दि. २८ फेब्रुवारी ते १० मार्च २०२५ दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण १६ पशुवैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. दि. १० मार्च २०२५ रोजी सदर प्रशिक्षणाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड, प्रमुख पाहुणे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, उदगीर नगर परिषदचे स्वच्छता विभाग प्रमुख विशाल आल्टे, तसेच वर्ल्ड वाईड व्हेटेरीनरी सर्व्हिसेसचे संचालक डॉ.शशिकांत जाधव, डॉ. वैभव वाघ आणि डॉ. शिवप्रसाद, प्रशिक्षण समन्वयक डॉ. अनिल पाटील, डॉ. रविराज सूर्यवंशी, उदगीर नगर परिषदचे स्वच्छता निरीक्षक उमाकांत गंडरे मंचावर उपस्थित होते. डॉ. गायकवाड यांनी याप्रसंगी श्वानाचे निर्बीजीकरण करून श्वान संख्या कशी कमी करता येईल? याचे महत्व मांडले, तसेच अति उच्च दर्ज्याचे पशुवैद्यक शास्त्रातील संशोधनाचा समाजसेवेसाठी कसा उपयोग करत येईल, याचे महत्व सांगितले. डॉ. मार्कंडेय यांनी उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालय नेहमीच समाजसेवेसाठी कार्यरत असते व तसेच पुढील उज्ज्वल भविष्याकरिता पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विशेष अभियानाबाबत डॉ. शशिकांत यांनी उपस्थितानां माहिती दिली. श्वान निर्बिजीकरण कार्यक्रमामुळे फायद्याचे महत्व उदगीर नगर परिषदचे स्वच्छता विभाग प्रमुख यांनी मत मांडले. समारोप प्रस्तावना प्रशिक्षण समन्वयक डॉ. अनिल पाटील यांनी केली. या प्रसंगी महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी पदव्युत्तर विद्यार्थी व अंतिम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. विभा मोवडे व आभार प्रदर्शन डॉ. सुदर्शन पटूले यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!