संस्कृतीच्या कुटुंब या विद्यापीठाचा पहिला कुलगुरू स्त्री होय : बालासाहेब शिंदे
उदगीर (एल.पी.उगीले) शिक्षणामुळे आधुनिक काळात स्त्रियांची परिस्थिती सुधारत आहे. आज स्त्रिया हिमालयापासून ते अंतराळापर्यंत सगळीकडे आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन मंगळापर्यंत झेप घेत आहेत. स्त्री ही कितीही सुशिक्षित आणि मिळवती असली तरी तिच्या अंतकरणाची मूळ प्रेरणा घरच आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढतात, झगडतात आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. भारतीय संस्कृतीच्या कुटुंब या विद्यापीठाचा पहिला कुलगुरू स्त्री होय. महिला आपल्या स्त्री सुलभ वात्सल्याने आपल्या कुटुंबाचे पोषण आणि संवर्धन करतात. स्त्रीचे दयाळू हृदय हीच स्त्रीची खरी संपत्ती. स्त्री ही पैशावर नव्हे तर प्रेमावर, वासल्यावर जगते. आपल्या अंतरंगात सुगंधित कस्तुरी आहे. हे कस्तुरीमृगाला कोठे ठाऊक असते. त्याचप्रमाणे स्त्रीला आपल्या वास्तल्याबद्दल ही माहिती नसावेत असे प्रतिपादन बालासाहेब शिंदे अतनूरकर यांनी केले.
ते जागतिक जागतिक ग्राहक हक्क दिनांपर्यंत महिला जागर जनजागृती मोहीमेच्या वतीने जिजामाता महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.संध्या शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रूक्मिणी सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था अतनूर च्या वतीने अध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सरपंच श्रीमती इंद्ररबाई रामचंद्र शिंदे, राजकुमार कापडे, आर.एल.अतनूरकर बाबर, चंद्रकांत शिंदे, सौ.श्वेता शिंदे, बालासाहेब शिंदे बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, प्रा. बिराजदार वर्षा गंगाधर, व्यंकटेश शिंदे, मयुरी शिंदे इत्यादींच्या वतीने कौतुक करण्यात आले. यावेळी संगीता पाटणे, अरुणा देशपांडे आणि गीता ताई उपस्थित होत्या. महिला जागर मोहिमेअंतर्गत उपेक्षित नारी शक्तीचा सन्मान करताना यावेळी प्रत्येक महिलेने स्वतःची ओळख मांडली. त्यांनी त्यांचे अनुभव ही मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सोमवंशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनिता भंडारे यांनी मानले.
