तानाजी सोनकांबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ 20 मार्च रोजी आक्रोश मोर्चा
उदगीर (एल.पी.उगीले) मजुरी मागीतल्याने तानाजी सोनकांबळे यांना कंत्राटदार मेहराज पटेल , खलील ठाणेदार , गौस या आरोपींने जबर मारहाण करून तानाजी सोनकांबळे यांची हत्या केली होती. हात्येच्या निषेधार्थ व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने उदगीर येथे गुरुवार दि २०मार्च रोजी सकाळी १०वा डाॅ अण्णा भाऊ साठे पुतळा ते तहसील कार्यालय पर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . मोर्चाच्या नियोजनासाठी शासकिय विश्रामगृह येथे सकल मातंग समाजाची बैठक घेण्यात आली. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रा पंडित सूर्यवंशी, जवाहरलाल कांबळे, अरविंद शिंदे ,राजकुमार चव्हाण, संग्राम अंधारे, बालाजी रणदिवे, शेषराव करखेलीकर, प्राचार्य गोविंद भालेराव, उपेंद्र चव्हाण, अजित कांबळे, प्रल्हाद थोरे, पप्पू गायकवाड , प्रभुदास गायकवाड ,एडवोकेट कांबळे ,प्रदीप जोंधळे, दयानंद कांबळे, सुदर्शन मसुरे, ईश्वर सूर्यवंशी, ऍड किशोर खादीवाले, रवींद्र बेद्रे, मारुती गायकवाड, दीपक गायकवाड, विश्वनाथ गायकवाड , करण आंधारे ,रणजित कांबळे, रामेश्वर शिंदे, देवेन टाकळकर ,संतोष रणक्षेत्रे आदी उपस्थित होते.
