छत्रपती छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयामध्ये वनस्पती शास्त्राच्या वतीने व्याख्यान संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयामध्ये “वनस्पतीशास्त्रातील करिअरच्या संधी “या विषयावर राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विशेष व्याख्यान ठेवण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे तर प्रमुख पाहुणे डॉ. संजय बिरादार तर व्यासपीठावर वनस्पतीशास्त्र विभाप्रमुख डॉ. आर.पी. बिरादार, सहयोगी प्रा. डॉ. एस.व्ही. चाटें यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व छ. शिवाजी महाराज आणि डॉ. सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख व्याख्याते डॉ. संजय बिरादार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सातत्य, धैर्य व जिज्ञासू वृत्ती व विषयातील सखोल ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहे. शासकीय, निमशासकीय,खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी आहेत, त्या संधीचा फायदा करून घ्या. असेही आवाहन केले.अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे यांनी म्हटले,विद्यार्थी केंद्रीत व सहअभ्यास क्रमीक कार्यक्रमांच्या आयोजनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये, तर्क चिकित्सक वृत्ती, समस्या निराकरण व्यक्तीचा विकास होतो, व विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये प्रेरणा मिळते असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.एस.व्ही. चाटे यांनी करून दिला तर आभार डॉ. एम. ए. पाटेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आर. पी.बिरादार, डॉ. डी.पी.पाटील, कु श्वेता कांबळे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.
