श्री. हावगीस्वामी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कृषि अभ्यास दौरा संपन्न

0
श्री. हावगीस्वामी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कृषि अभ्यास दौरा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत डोंगरशेळकी तांडा येथील नामांकित कृषी महाविद्यालयास श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील कला शाखेतील पदवीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी , येथील भेट देऊन , या महाविद्यालयात कृषी क्षेत्रातील राबविण्यात येणाऱ्या अद्यावत विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक ज्ञान अवगत केले . सदरहू अभ्यास दौरा हा,या दोन्हीही महाविद्यालय अंतर्गत करण्यात आलेल्या ” “सामंजस्य करारा अनुसार ” आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यामध्ये , श्री हावीस्वामी महाविद्यालयातील एकूण २५ विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी झालेले होते .
कृषी महाविद्यालयात , यशस्वीरित्या राबविण्यात येत असलेल्या अनुभवाधारित प्रात्यक्षिक उपक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन, त्यासंबंधीची विस्तृत माहिती आवत केली.प्रा. बी.बी. निम्मंवाड ( कृषीविद्या विभाग ) यानी ” गांडूळ खत उत्पादन ” , डॉ . करण जाधव ( उद्यानविद्या विभाग ) यांनी प्रक्षेत्रावरील ” व्यवसायिक भाजीपाला लागवड व विपणन ” , प्रा.सुदाम डफडे ( मृदा शास्त्र व कृषी रसायनशास्त्र विभाग ) यांनी माती / मृदा तपासणीचे महत्व आणि मृदा परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावयाचा याचे प्रात्यक्षिक , मातीचे रासायनिक , भौतिक व जैविक गुणधर्म, विविध पिकांसाठीचे आवश्यक मूलद्रव्ये , रासायनिक व सेंद्रिय खतांचे विविध प्रकार इत्यादीं विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
सदरहू अभ्यास दौऱ्याचे यशस्वी नियोजन डॉ.ए.ए. कुलगापूरे व डॉ. आर. एस.राठोड (श्री. हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर) यांनी केले . या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी , कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगद सूर्यवंशी , उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील , डॉ.ए. जी. दापकेकर , समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थिनींचे बहुमोल सहकार्य लाभले .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!