लोक कल्याणकारी योजना राबवण्याची क्षमता भाजपा मध्येच – देशमुख
लातूर (एल पी उगीले) : सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणे आणि लोकांचे प्रश्न सोडवत असताना त्यांच्या हिताचे निर्णय घेणे. ही क्षमता भारतीय जनता पक्षातच आहे असे उद्गार भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दीलीपराव देशमुख यांनी काढले.
ते चापोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते. चापोली ग्रामपंचायतची वतीने आ. रमेश अप्पा कराड आणि दीलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, प्रा तुकाराम गोरे, प्रा विजय क्षीरसागर, उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंद नरहरे, सतीश आंबेकर, जिपचे माजी सदस्य तुकाराम मद्ये, ऍड सुधाकर जगताप, रमेश पाटील, चेअरमन बालाजी शेवाळे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर होनराव, ज्ञानोबा वाघमारे, माजी चेअरमन भाऊसाहेब होनराव, दत्तात्रय कुलकर्णी, महेश कांबळे, बसवेश्वर मुर्गे ,माजी उपसरपंच जिलानी शेख, शांतप्पा गादगे, बालाजी कासले, महालिंग होनराव, रमाकांत होनराव, साई हिप्पळगे, रुद्र होळदांडगे, द्वारकानाथ गोरगीळे, नारायण जामकर, संदीप आंबदे, चांद शेख, युनुस मोमिन, वीरभद्र स्वामी, शंकर चाटे, माऊली चाटे, अतुल जंपनगिरे, बसवराज स्वामी, व्यंकट चाटे ,बालाजी कांबळे, नामदेव पांचाळ, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे ध्येयधोरणे हे जनसामान्यांच्या हितासाठी असून लोकहिताची प्रत्यक्ष नियोजन करून अंमलबजावणी करनण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टी कडेच आहे. आदर्श तत्व आणि तत्वनिष्ठ कार्यकर्ते यामुळे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात सत्तेत राहील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश आप्पा कराड यांनीदेखील सत्काराला उत्तर देताना येणाऱ्या काळातील सर्वच आघाड्यांवरील सत्ता भारतीय जनता पक्षाकडे राहिल. असा विश्वास व्यक्त केला.