पर्यावरण पूरक होळी जिव्हाळा ग्रुपकडून साजरी

0
पर्यावरण पूरक होळी जिव्हाळा ग्रुपकडून साजरी
 उदगीर (एल.पी.उगीले) जिव्हाळा ग्रुपच्या वतीने पर्यावरणपूरक होळीचा आनंद एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
 नागपूरच्या पशू वैद्यकीय व मत्स्य विद्यापिठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ.अनीलजी भिकाने यांच्या व संत तुकाराम विधी महाविद्यालय उदगीरचे प्राचार्य ॲड.राजकुमार नावंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  अशोकराव बिरादार यांनी भूषविले.

या कार्यक्रमाची संकल्पना राबविणारे विश्वनाथराव मुडपे गुरुजींनी सर्वांना गुलाल लावला.तसेच होळी निमित्त होळीचे महत्व विषद करणारे गीत सादर केले. हास्य,विनोद,गाणी,असंबद्ध भाषण नकला इत्यादीचे सदस्यांनी सादरीकरण उत्तमरित्या केले.यात प्रामुख्यानी दशरथराव शिंदे, शंकरराव केंद्रे, विश्वनाथराव माळेवाडीकर, चंद्रकांत पांचाळ,चंद्रकांत रोडगे, शंकरराव साबणे, वैजनाथराव पंचगल्ले, अशोकराव हळ्ळे,हावगीराव आधारे, सचीन बापूंरे,प्रा.रमाकांत मध्वरे, चंद्रकांत उप्परबावडे ,रामराव मोमले, प्रा.डी.आर.पाटील व देविदासराव नादरगे इत्यादी सदस्यांनी हिरीरिने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिव्हाळा ग्रुप अध्यक्ष रमाकांत बनशेळकीकर यांनी केले. डॉ. अनील भिकाने यांचे समयोचित मार्गदर्शन झाले.
अध्यक्षीय समारोप अशोकराव बिरादार यांनी केला. जिव्हाळा ग्रुपचे उपाध्यक्ष दशरथराव शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
माणसाच्या मनात घर करुन राहिलेल्या मोह, मद, मत्सर, क्रोध, तिरस्कार व घृणा या षड्विकारावर मात करुन सहजीवन आनंदाने जगण्याचा संदेश देणारे जिव्हाळा ग्रुपचे समाजात कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास व्हि.एस.कुलकर्णी व विक्रम हालकीकर, दिलीप खंदारे, चंद्रकांत खटके, सोपानराव माने यांची विषेश उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!