साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांचा सत्कार संपन्न

0
साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांचा सत्कार संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले)अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ ,शाखा लातूर व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सोहळा लातूर येथील एमआयडीसी मधील विवेकानंद विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात शांतिनिकेतन विद्यालय कोदळी ता. उदगीर येथील सहशिक्षिका तथा साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त लातूर येथील आयोजित कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लातूर येथील महिला आघाडी अध्यक्षा रेणुका गिरी तर प्रमुख पाहुण्या म्हणून जेएसपीएम लातूर येथील सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर, मुरुड डायटच्या प्राचार्या भागीरथीबाई गिरी, गोदावरी देवी लाहोटी कन्या शाळा लातूर येथील मुख्याध्यापिका संगीता कासार व इतर मान्यवर उपस्थित होते.
साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी याचा आढावा घेऊन वर्षाराणी मुस्कावाड यांचा महिला दिनानिमित्त सत्कार, स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांचा सत्कार संपन्न झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे, धनंजय गुडसूरकर, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, विवेक होळसंबरे, प्रा. कुमार बंडे, प्रा. धनराज बंडे, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!