ग्रामीण भागातील खेळाडुंनी देशपातळीवर आपला नावलौकिक वाढवावा : आ.संजय बनसोडे

0
ग्रामीण भागातील खेळाडुंनी देशपातळीवर आपला नावलौकिक वाढवावा : आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या दिड वर्षाच्या कार्यकाळात क्रीडा विभागाचा मंत्री म्हणून काम करत असताना राज्यातील खेळाडुंच्या हितासाठी अनेक हिताचे निर्णय घेवुन खेळाडुंना प्रोत्साहित केले. आपल्या ग्रामीण भागातील खेळाडुंना देशपातळीवर खेळण्याची संधी प्राप्त व्हावी, म्हणून उदगीरला स्व.खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, फुटबाॅलचे डे – नाईट सामने, मिनीस्टर ट्राॅफी सह विविध स्पर्धा घेवुन खेळाडुंना प्रोत्साहान दिले.त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडुंनी जिद्द व चिकाटीने खेळुन देशपातळीवर आपला नावलौकिक वाढवावा.असे मत माजी क्रिडा मंत्री आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
ते उदगीर तालुक्यातील दावणगाव येथे आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती निमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आ. संजय बनसोडे आमदार चषक 2025 च्या समारोप समारंभ प्रसंगी बोलत होते.
या वेळी प्रा. श्याम डावळे, धानाजी मुळे, राजकुमार बिरादार, यशवंतराव ढगे, योगेश फुले, यादवराव केंद्रे, रमेश भंडे, लक्ष्मण कुंडगिर, विश्वनाथ भंडे, युसुफ घाडीवाले, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे, मी सदैव खेळाडुंच्या हितासाठी प्रयत्नशील असुन मागील काळात विविध राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या आहेत. दावणगावकरांनी आमदार चषक स्पर्धा घेतली आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या आमदार चषक स्पर्धेचा अंतिम सामना हा दावणगाव व शेकापुर यांच्यात होत असुन दोन्ही संघाच्या खेळाडुंनी जीव ओतून, खेळुन आपल्या भागाचे नाव करावे. सदर सामने १० षटकाचे असल्याने चुरस अधिक असेल, आपल्या भागात टी टेन सामने खेळवण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असुन ग्रामीण भागातील खेळाडुंना भविष्यात अडचण होवु नये म्हणून उदगीरमध्ये क्रीडा संकुल उभारत असुन त्याचेही काम लवकरच सुरु होणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी सहभागी संघाचे खेळाडु व क्रिकेट प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!