शास्त्रोक्त पध्दतीने तपास करत 24 तासाचे आत खुनातील दोन्ही आरोपींना अटक

0
शास्त्रोक्त पध्दतीने तपास करत 24 तासाचे आत खुनातील दोन्ही आरोपींना अटक
  लातूर (एल.पी.उगीले)  लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या एका खुनाच्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत माहिती अशी कि, दिनांक 14 मार्च रोजी मनिष रुपसिंग पाल (वय २० वर्षे रा. घिलौर ता. नंदीगाव जि. जालोन  राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार हरंगुळ रेल्वे स्टेशन समोर, समर्थ नगर, हरंगुळ (बु)) यास हरंगुळ रेल्वे स्टेशन समोरील पाण्याच्या टाकी जवळ पाणीपुरी विक्री व्यवसाय करत असताना दोन अज्ञात व्यक्तीने चाकुने पोटात व डावे हातावर मारुन गंभीर जखमी करुन त्याचे जवळील मोबाईल व पैसे काढून घेवुन खून केल्याची घडली होती. 14 मार्च रोजी रात्री पानीपुरी विक्रेता, मयताचा भाऊने फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाणे एमआयडीसी लातुर येथे गु.र.न. 182/2025 कलम 103(1), 311,3 (5) भारतीय न्याय संहीता प्रमाणे दिनांक 14/03/2025 रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे हे पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवून गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पध्दतीने तपासाला सुरुवात केली. 
  पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातुर शहर) रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन एमआयडीसी लातुर येथील चार पथक तयार करुन त्यांना सखोल मार्गदर्शन व सुचना करुन तात्काळ रवाना करण्यात आले होते. दरम्यान सदर पोलीस पथकांनी गोपनीय बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून तपासाची दिशा निश्चीत करुन आटोकाट प्रयत्न करत नमुद मनिष रुपसिंग पाल याचे मारेकरऱ्याचा शोध घेतला.

वरीष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथकांने यातील नमुद मनिष रुपसिंग पाल यांचे मारेकरी दत्ता संजय ढोरमारे, (वय 20 वर्षे, राहणार पटेल नगर लातुर),. आयान अब्दुल शेख, (वय २० वर्षे, राहणार कपील नगर लातुर).यांना त्यांचे राहते ठिकाणाहून 24 तासाचे आत ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सुधाकर देडे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातुर शहर) रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, सपोनि. द्रोनाचार्य, नेटके, पोउपनि मोरे, राजपुत, सफौ बेल्लाळे, जगताप ,पोलीस अंमलदार दामोदर मुळे, कांबळे, भोसले, प्रशांत ओगले, राजू मस्के, साखरे, माने, सोनकांबळे, वायगावकर, बुजारे, वाहुळे, जाधव, महिला पोलीस अमलदार चव्हाण यांनी केलेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!