प्रा .ज्योती कवडेकर मद्देवाड यांना समाज प्रबोधीनी पुरस्कार जाहीर
उदगीर (एल.पी.उगीले) अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा अहमदपूरच्या वतीने दिला जाणारा समाज प्रबोधीनी पुरस्कार प्रा.ज्योती कवडेकर मद्देवाड याना जाहिर झाला असुन, राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, प्रसिद्ध वक्त्या वृषाली किन्हाळकर यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रा. ज्योती कवडेकर मद्देवाड यांनी रंगकर्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील १० वर्षापासुन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, आरोग्य, क्रिडा आदी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. १६ मार्च रोजी अहमदपूर येथे होणार असल्याचे अनिसचे मेघराज गायकवाड यांनी कळविले आहे.
