शालेय परिसर स्वच्छता करून केर कचऱ्याची होळी साजरी

0
शालेय परिसर स्वच्छता करून केर कचऱ्याची होळी साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) विमलाबाई देशमुख कन्या प्राथमिक शाळा अहमदपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून शालेय परिसर स्वच्छ केला. व त्या केर कचऱ्याची होळी साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती शोभाताई राजपंगे यांनी मुलींना होळी व धुलीवंदन या सणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जुने सण नव्या संकल्पना या उपक्रमांतर्गत इंधन वाया न घालवता मुलांना शालेय परिसर स्वच्छता करून त्या केरकचऱ्याची होळी करण्याचे सांगण्यात आले होते. तसेच मुलींना यावेळी आपल्या मनातील वाईट विचार किंवा दुर्गुण एका कागदावर लिहिण्यास सांगण्यात आले व ते दुर्गुण या होळीमध्ये जाळण्यास सांगितले. शालेय परिसरा बरोबरच मनातील वाईट विचारांची ही होळी या निमित्ताने करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती राजपंगे यांनी होळीचे पूजन केले. सर्व मुलींनी रंग उत्सवाचाही आनंद यावेळी लुटला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्कार विभागप्रमुख श्रीमती प्रतिभा गोरटे यांनी केले. तर फलक लेखन श्रीमती जयश्री गेडेवाड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती वनिता पाटील, वनिता मुंडकर, श्रीमती मंदाकिनी भोसले, श्रीमती प्राची कुलकर्णी, श्रद्धा खलसे, हनुमंत कनकुरे, गंगाधर गळगे यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाचे संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती सीमाताई देशमुख, संस्थेचे सचिव पी. डी . कदम यांनी कौतुक केले आहे. व सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!