सरदार वल्लभभाई पटेल शाळेत प्रदूषणमुक्त होळी.

0
सरदार वल्लभभाई पटेल शाळेत प्रदूषणमुक्त होळी.

उदगीर (एल.पी.उगीले)
राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी विभागात उत्साहात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात होळी दाखवून प्रदूषणमुक्त होळी साजरी करण्यात आली. सहशिक्षिका सौ वृर्षाला जाधव यांनी होळी सणाबद्दल सखोल माहिती सांगितली. संदीप पाटील यांनी होळीच्या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगाचा हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो, असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौ आशा बेंजरगे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी होळी हा सण प्रदूषणमुक्त साजरा करायचा आहे, तसेच नैसर्गिक कोरड्या रंगाची होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली पाहिजे, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. होळी पूजनाची सर्व तयारी अर्चना सोलापूरे बाईंनी केली. सर्व शिक्षकांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांसमवेत सर्व शिक्षकांनी उत्साहात होळी साजरी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. होळी सणाचे सूत्रसंचालन सपना होनराव हिने केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!