वाहनाचा नंबर प्लेट शासनातर्फे बदलून देण्यात यावा – अभिजीत औटे
उदगीर (एल.पी.उगीले) लातूर जिल्हातील व प्रत्येक तालुक्यातील वाहनाच्या नंबर प्लेट शासना तर्फे बदलून देण्यात याव्यात, व उदगीर शहरातील वाढिव पानीपट्टी कमी करण्यात यावी, यासाठी जिल्ह्य दक्षता समितीचे अशासकीय सदस्य अभिजीत औटे यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत शासकीय जिल्हा दक्षता समिती अशासकीय सदस्य अभिजीत औटे यांनी शासनाने 2018 पुर्वीच्या वाहनाचे नवीन नंबर प्लेट बसवण्याचा आदेश काढलेला आहे. परंतु ग्राहकांनी गाडी घेते वेळी त्या नंबर प्लेटचे पैसे दिलेले आहेत. त्या मुळे शासनाने याची जवाबदारी घेऊन, शासना तर्फे नंबर प्लेट बदलून देणे गरजेचे आहे. तसेच उदगीर शहरातील पानी पट्टी इतर तालुक्याच्या तुलनेत जास्त आहे, ती कमी करण्यात यावी, अशी मागणी लातूर येथील जिल्ह्य पुरवठा अधिकारी व सचिव जिल्हा दक्षता समिती यांच्या कडे पत्र देऊन, करण्यात आल्याची माहिती, शासकीय जिल्हा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य अभिजीत औटे यांनी सांगितलेले आहे.
