लातूर जिल्हा पूर्व संरक्षण उपाध्यक्षपदी कमलाकर सांगवीकर यांची निवड

0
लातूर जिल्हा पूर्व संरक्षण उपाध्यक्षपदी कमलाकर सांगवीकर यांची निवड

उदगीर (एल.पी.उगीले) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्धमहासभा लातूर जिल्हा पूर्व कार्यकारणीची पुनर्बांधणी मात्र संस्था राष्ट्रीय संरक्षण महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा कार्यकारणी गठन बैठक होऊन सिद्धार्थ बुद्ध विहार उदगीर येथे नवीन कार्यकारणी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित प्रमुख पाहुणे सी. बी. तेलतुंबडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशोक भाऊ केदारे, सरचिटणीस प्रा. बापूसाहेब गायकवाड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून नियुक्ती आदेश पत्र देण्यात आले. त्याप्रसंगी प्रा. सी. एम.कांबळे अध्यक्ष, माधवराव जाधव सरचिटणीस, बी. जी. घाटे कोषाध्यक्ष, कमलाकर सांगवीकर संरक्षण उपाध्यक्ष, अमोल कांबळे संरक्षण सचिव, यशोदीप सूर्यवंशी संघटक, अशा 21 जणांचे कार्यकारणी निवड करण्यात आली. झालेल्या निवडी बद्दल सर्व समता सैनिक दल मित्र परिवार लातूर जिल्हा पश्चिमचे सर्व पदाधिकारी पेंटर व पत्रकार यांच्याकडून कमलाकर सांगवीकर यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!