प्रा .ज्योती कवडेकर मद्देवाड समाज प्रबोधीनी पुरस्काराने सन्मानित.

0
प्रा .ज्योती कवडेकर मद्देवाड समाज प्रबोधीनी पुरस्काराने सन्मानित.

उदगीर (एल.पी.उगीले)येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व
प्रा ज्योती कवडेकर यांचा मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
उदगीर येथील रंगकर्मी प्रतिष्ठानच्या सचिव प्रा ज्योती कवडेकर मद्देवाड यांना समाज प्रबोधिनी पुरस्काराने ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . प्रा ज्योती कवडेकर मद्देवाड यांनी रंगकर्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील १० वर्षापासुन सामाजिक , शैक्षणिक सांस्कृतीक ,आरोग्य ,क्रिडा आदी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल अहमदपूर जि लातूर येथिल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रा ज्योती कवडेकर मद्देवाड यांना समाज प्रबोधीनी पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील , यांच्या हस्ते अहमदपूर येथे झालेल्या समारंभात सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, प्रसिद्ध वक्त्या वृषाली किन्हाळकर, अनिसचे मेघराज गायकवाड आदींची उपस्थिती होती.
या पुरस्काराबद्दल रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड ,सिद्घार्थ सुर्यवंशी,रसुल पठाण,रामदास केदार , ॲड. महेश मळगे, लक्ष्मण बेंबडे, महादेव खळूरे, दादाराव दाडगे , विवेक होळसंबरे,निता मोरे, मारोती भोसले , सचिन शिवशेट्टे ,जहांगीर पटेल,ज्ञानेश्वर बडगे, हणमंत केंद्रे, नागनाथ गुट्टे , संदिप निडवदे ,मनोहर लोहारे आदीनी अभिंनदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!