महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात वचन साहित्य व मानवी मूल्यांवर राष्ट्रीय चर्चासत्र
उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील कन्नड विभाग व प्रसारंगा, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वचन साहित्य आणि मानवी मूल्ये’ या विषयावर एक दिवसीय आंतरशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र 22 मार्च 2025 (शनिवार) रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडणार आहे. या चर्चासत्राचे अध्यक्ष महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी ही राहणार असून उद्घाटन सिद्धप्पा धारवाड विश्वविद्यालय, धारवाड यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते अखिल भारतीय शरण साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शंभुलिंग कामन्ना हे राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के व उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे,डॉ. रमेश एच. मुलगे प्रमुख, कन्नड विभाग यांनी केले आहे. सर्व अभ्यासक, विद्यार्थी, संशोधक आणि रसिकांना या चर्चासत्राला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी केले आहे.
