वैद्यकीय क्षेत्रातील असामान्य कार्यकृतत्व म्हणजे मेरी लास्कर होय – डॅनिअल मस्करणीस

0
वैद्यकीय क्षेत्रातील असामान्य कार्यकृतत्व म्हणजे मेरी लास्कर होय - डॅनिअल मस्करणीस

उदगीर (एल.पी.उगीले)

   अमेरिकेतील मेरी लास्कर या काही डॉक्टर, संशोधिका किंवा राजकीय व्यक्ती नसल्या तरी त्या आरोग्याशी निगडित समस्येमुळे अस्वस्थ होत्या.लास्कर फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने कार्य करीत राहिल्या.गरजेपोटी दानशूर व्यक्ती कडून वर्गणी गोळा करायच्या. प्रसंगी राजकीय लोकांना जाब विचारत या सामान्य स्त्रीने आरोग्य आणि कर्करोगाशी निगडित वैद्यकीय क्षेत्रातील असामान्य कार्यकृतत्व म्हणजे मेरी लास्कर होत, असे विचार पुणे येथील आयटी तज्ज्ञ व साहित्यिक डॅनिअल मस्करणीस यांनी व्यक्त केले.
   उदगीर येथील वाचक संवादाचे ३३३ वे पुष्प  डॅनिअल मस्करणीस यांनी मेरी लास्कर या स्वलिखित पुस्तकावर संवाद साधून गुंफले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पत्रकार डॉ.धनाजी कुमठेकर हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॅनिअल मस्करणीस म्हणाले, मेरी लास्कर यांच्या प्रयत्ना मुळे अमेरिकेत विविध आजारावर कार्य करणाऱ्या लास्कर फाउंडेशनच्या २७ उपसंस्था कार्यरत आहेत. याचा उपयोग केवळ अमेरिकेतील लोकांनाच नाही, तर जगातील शेकडो लोकांच्या आरोग्यासाठी होत आहे. आज आरोग्याशी निगडित कार्य करण्यासाठी संस्था आहेत, परंतु समाज व राजकीय लोकांचे पाठबळ त्यांना नाही. निधी कमी पडत असल्यामुळे या संस्थेमार्फत समाधानकारक संशोधन होत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत मेरी लास्कर यांनी आरोग्यासाठी केलेले कार्य विचार करायला लावणारे आहे. 
     यावेळी उपस्थित श्रोत्यांनी अनेक प्रश्न विचारले, त्यास संवादकांनी अतिशय वस्तुनिष्ठपणे समाधानकारक उत्तर देत श्रोत्यांना अंतर्मुख केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य संयोजक अनंत कदम, आनंद बिरादार, तुळशीदास बिरादार, डॉ.कांत जाधव, मुरलीधर जाधव, प्रा.राजपाल पाटील, सुरेश वजनम आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास रमेश अंबरखाने, डॉ.संग्राम पटवारी आदींसह अनेक मान्यवर, विद्यार्थी, पत्रकार, वाचक, बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित  होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय डॉ.म.ई.तंगावार तर आभार प्राचार्य डॉ.शिवाजी सगर यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!