116 किलो गांजासह वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त

0
116 किलो गांजासह वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त

लातूर (एल.पी.उगीले) अवैध नशा पान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गांजाचा वापर केला जातो. अशा पद्धतीने गांजा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर लक्ष्य ठेवून पोलीस निरीक्षक रजेतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली औसा पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. 116 किलो गांजा जप्त केला आहे, तसेच या गांजाची वाहतूक करण्यासाठी उपयोगात येणारे वाहन ही जप्त केले आहे.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने तेलंगाना, ओडिसा व औसा येथील तीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाणे औसा येथील कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कारवाई कौतुकास्पद आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 19 मार्च रोजी औसा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, महात्मा फुलेनगर, औसा येथे एक व्यक्ती त्याचे साथीदारसह राहते घरामध्ये स्वताच्या आर्थिक फायदयासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा, अवैधरित्या ताब्यात बाळगुन त्याची चोरटी विक्री करीत आहे. सदरची माहिती वरीष्ठांना कळवून शासकीय पंचासह महात्मा फुलेनगर, औसा येथे छापा मारला. सदर ठिकाणी एक संशयीत स्कार्पीओ वाहन क्रमांक ए.पी. 20 एन. 3637 दिसुन आली. त्यामध्ये दोन इसम
रमेश आर यादाईह, (वय 45 वर्ष रा. ओबलपुर, जाफरगड वरगंल राज्य तेलंगणा),निबास लक्ष्मीकांत बडइ, (वय 54 वर्ष रा. एमपीव्ही 82 मलकागिरी, मलाभरम राज्य ओडिसा) असे मिळून आले.
सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनात मध्ये गांजाचे प्लॉस्टीकने रॅपींग केलेले पॉकीटे व मोबाईल मिळाले. त्यादोघाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा
परशुराम देविदास कांबळे, (रा. फुलेनगर औसा).याने आमच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले. त्यावरून परशुराम कांबळे यांचे घराची झडती घेतली असता त्याच्या घरातपण पाच प्लॉॉस्टीकच्या गोण्या मध्ये लाहन मोठ्या आकाराचे प्लॉस्टीकने रॅपींग केलेले पॉकीटे व गाडी मध्ये मिळून आलेले असे एकुण 67 गांजाची पॉकिटे मिळून आले.
116.14 किलो ग्रॅम वजानाचा ओला व सुखा गांजा, एक सिल्वर ब्लॅक रंगाची महिंद्रा स्कार्पीओ (क्रमांक ए.पी. 20 एन. 3637), दोन मोबाईल फोन असा एकुण 15,81,400 रुपयेचा माल मिळून आल्याने नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे गुरनं. 108/25 कलम 20 गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली असून एक आरोपी परशुराम देविदास कांबळे (रा. फुलेनगर औसा) हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर, सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, प्रमोद बोंडले, सफौ. संजय कांबळे, पोलीस अंमलदार रामकिशन गुटे,मुबाजोददीन सय्यद, मोतीराम घुले,भरत भुरे,गोविंद पाटील, बालीका सरवदे यांनी उत्कृष्ठरित्या कामगिरी पार पाडली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!