करडखेल पाटी याठिकाणी बस थांबे, पथदिवे बसविण्यात यावेत : विवेक जाधव

0
करडखेल पाटी याठिकाणी बस थांबे, पथदिवे बसविण्यात यावेत : विवेक जाधव

उदगीर (एल.पी.उगीले) लातूर महामार्गाला हेर, जंगमवाडी, जायबाची वाडी, करवंदी, वायगाव, साताळा, कुंभारवाडी, करडखेल, भाकसखेडा, करडखेल आदी गावांना जोडणारे ठिकाण म्हणजे करडखेल पाटी. उदगीरपासून १७ किमी अंतरावर हे ठिकाण असल्याने आजूबाजूच्या गावातील प्रवासी, विद्यार्थी याच ठिकाणाहून शासनाच्या एस.टी.बसचा उपयोग करतात. परंतु लातूर व उदगीर मार्गे येणाऱ्या गाड्या करडखेल पाटी येथील मुख्य चौकात न थांबता त्याठिकाणी असलेल्या वस्तीपासून २०० ते ३०० मीटर अंतरावर थांबतात, आणि त्यामुळे प्रवाश्यांना एस.टी. बसमधून प्रवास करणेसाठी गैरसोय होत आहे. सर्व थांबे असणाऱ्या गाडीवरील बरेच चालकसुद्धा याठिकाणी गाडी थांबवत नाहीत. याठिकाणी बस थांबा नसल्यामुळे उन्हात बसची वाट पाहत येथील प्रवासी, विद्यार्थी यांना तासनतास थांबावे लागते. संध्याकाळी ७ नंतर पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी वाहनांच्या गर्दीमुळे एसटी बस थांबत नाहीत. प्रशासनाने या सर्व समस्यांकडे लक्ष द्यावे आणि करडखेल पाटी येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बस थांबे करून सदर ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसविले पाहिजे. जेणेकरून प्रवाशांची सोय होईल, प्रवासी, विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षेसाठी ते उपयुक्त ठरेल आणि सदर ठिकाणी न थांबणाऱ्या बसवर लक्ष ठेवण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पेन्सिल पासून ते शेतकऱ्यांच्या खतांपर्यंत हे सरकार जिएसटीच्या माध्यमातून कर गोळा करीत आहे परंतु नागरिकांना सुविधा देण्यात मात्र अपुरे पडत आहे. त्यामुळे फक्त कर गोळा करून जाहिरातबाजी करण्यापेक्षा नागरिकांसाठी सुविधाही द्यावात. अशी मागणी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष विवेक पंडितराव जाधव यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!