सुदर्शन बोराडे यांना पुरस्कार जाहीर
उदगीर (एल.पी.उगीले)
लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन बोराडे यांना आदर्श युवा समाजसेवक पुरस्कार, नुकताच जाहीर झाला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन, हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. अखिल सोनार समाज प्रतिष्ठान व सर्व शासकीय सोनार हक्क परीक्षा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने सन्मान सुवर्ण रत्नांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शुक्रवार दि. २८ मार्च रोजी पंढरपूर येथील श्री संत शिरोमणी महाराज समाधी ट्रस्ट महाद्वार येथे आयोजित सोहळ्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
